नवरात्र बंदोबस्तावरून परतताना दुर्घटना; सप्तशृंगी परिसरात PSIचा मृत्यू
नांदुरी-सप्तशृंगी गड परिसरात पोलिस पथकाच्या वाहनाला भरधाव कारने धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. या अपघातात पोलिस कर्मचारी आणि भाविकही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त आटोपून परतणाऱ्या पोलिस पथकावर काळाने घाला घातला. नांदुरी परिसरात भरधाव कारने पथकाला धडक दिली. या दुर्घटनेत वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला.
धडकेची तीव्रता मोठी असल्याने पोलिस कर्मचारी आणि परिसरातून प्रवास करणारे काही भाविक जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, जखमींची संख्या ११ पेक्षा अधिक आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्युटी संपवून परतत असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.