← द टाइम्स ऑफ महाराष्ट्र
↗ ☆
हृदय पिळवटून टाकणारी घटना! मुलाच्या मृत्यूने आईचाही जीव गेला

हृदय पिळवटून टाकणारी घटना! मुलाच्या मृत्यूने आईचाही जीव गेला

बुधवार, २७ मे २०२६ • 04:51 PM • 12.8K वाचले

भीषण उष्णतेमुळे सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू सहन न झाल्याने आईचाही काही तासांत मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशात घडली.

देशभरात वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांचे हाल होत असताना मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आईनेही प्राण सोडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

हसनैन अहमद हा मुलगा शनिवारी दुपारी अचानक अस्वस्थ झाला. प्रचंड उकाडा आणि उन्हामुळे त्याला उष्माघाताचा त्रास झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोटात तीव्र दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने डॉक्टरांकडे धाव घेतली.

उपचार सुरू असतानाच मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाला गमावल्याचा जबर मानसिक धक्का आई रझिया खातून यांना बसला. धक्का सहन न झाल्याने त्यांची प्रकृतीही खालावली आणि काही वेळातच त्यांचाही मृत्यू झाला.

या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून परिसरात शोकाचे वातावरण आहे.

स
संपादकीय विभाग
द टाइम्स ऑफ महाराष्ट्र